Sunday, December 31, 2017

बालपणीचा ठेवा

लहानपणी नगरला असताना, बहुधा 90 मध्ये पुस्तकांचं एक प्रदर्शन भरलं होतं. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे लहान मुलांची  खूप सुंदर पुस्तकं तिथं होती.
बरीचशी सोविएट रशियाच्या काळातली मराठीत भाषांतरीत झालेली रशियन पुस्तकं तिथं होती. मला दोन-चार घ्यायला मिळाली आणि सुदैवाने ती आजवर टिकली. आता माझ्या मुलाला तो अनमोल ठेवा द्यायचाय.
तसंच माझ्या पिढीतील इतरांना ज्यांनी हे अनुभवलंय, त्यांच्या मुलांसाठी किंवा नविन पिढीसाठी मी हे share करतोय.